यंत्रणा बसवल्याशिवाय नियमीतपणे 'उतारणा' कठीण..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग विमानतळार सध्याच्या पावसाळी हवामानामुळे विमान उतरवूक विमानाच्या पायलटांका सध्या जडच जाता हा असा चित्र आसा. गेल्या पंधरा दिवसात दोन पावटी खराब हवामान आणि मळबटीच्या कारणान विमाना
सलग तीन विमानाचे फेरीये रद्द करुची पाळी ‘अलायन्स एअर कंपनीवर’ इलेली आसा.
यावरना सामान्य विमान प्रवाशांका आता वाटाक लागला की या पावसाळी मोसमात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवेवर अवलंबून रवाचा की नाय..?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपीच्या सड्यार गेल्यावर्षी ९ ऑक्टोबराक अलायन्स एअर कंपनीची ७२ आसनी प्रवासी विमान सुरू झालेली. या विमानसेवेक प्रवाशांनी तसो बरो प्रतिसाद दिलेलो. पण विमानसेवा सुरू झाल्यापासुन या ना त्या कारणान, चार पाच पावटी विमानफेरी रद्द करुची पाळी अलायन्स एअर कंपनीवर इली या देखील खरा आसा.
सिंधुदुर्गात जोरदार पावसाळी मौसम सुरू झालो हा आणि या पावसाळी मौसमात पायलटाक धावपट्टी स्पष्टपणे दिसना नाय म्हणान गेले तीन दिवस विमान रद्द करुची पाळी अलायन्स एअर कंपनीवर इली. विमानफेरीये रद्द झाल्याच्या कारणान महत्वाच्या कामाक सिंधुदुर्गातना मुंबईकडे जाणार्या प्रवाशांचे लय हाल झाल्याची माहिती सूत्रांकडना समाजता.
विमानसेवेपेक्षा आता रेल्वे नायतर आपली एसटी आणि लक्झरी सेवाच बरी असल्याचा काही प्रवाशांनी बोलून दाखवला. खराब हवामानात विमान सेवा यव्वस्थीत सुरू ठेवच्यासाठी लागणारी सुसज्ज यंत्रणा विमानतळावर अजूनतरी लावुक नसल्या कारणान अलायन्स एअर कंपनीची गोची झालेली आसा असा बोलला जाता हा.
एकंदर या पावसाळी मोसमात विमानसेवा कधी चालू तर कधी बंद अशीच सध्याची स्थिती आसा. पावसाळो आसा तोपर्यंत विमानसेवा राम भरोसेच रवाची शक्यता आसा की काय असो सवाल सामान्य जिल्हावासियांका पडलेलो आसा.
यासंदर्भात विमानतळार जे काही आवश्यक यंत्रणा बसवुक होये त्यासाठी संबंधीत विभागान लवकरात लवकर पावला उचलूक होयी.
विमानसेवा सुरु होवन अजून वर्ष पण लोटला नाय हा आणि हो विमानसेवेसाठीचो पयलोच पावसाळी अनुभव आसा त्यामुळे पायलटांचे अनुभव,त्यांचे सूचना आणि मागणे यांचो सारासार अभ्यास करुन त्यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना केली जाईतच अशी आशा आसा..
तशी कोकणातली खयलीच तत्वा आणि घटक चापकन् लक्षात येवचे नाय. त्यासाठी अनुभव आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टींची गरज आसता आणि हो पाऊस सुद्धा शेवटी ‘कोकणातलो’ आसा म्हणल्यार विमानसेवा तज्ञांका वायच जास्तच मेहनत घेवची लागतली या खराच..!
सध्या सामाजिक,वैद्यकीय,राजकीय,औद्योगिक,कौटुंबिक वगैरे सगळ्याच क्षेत्रात कधीय आणिबाणीची स्थिती येऊ शकता म्हणान विमानतळारच्या सुसज्ज लॅन्डिंग यंत्रणेसाठी सर्व स्तरातून आग्रह होईतच ही आशा आसा.
विमानफेरी रद्द होतली की चालू आसतली अशा विचारांच्या धाकधुकीची जत्रा हीच मात्र सध्या आसा पावसाळ्यातली हवाईयात्रा या नक्की. त्यामुळे लॅन्डिंगसाठी आवश्यक सुसज्ज यंत्रणा बसवल्याशिवाय चिपी विमानतळार नियमीतपणे विमान ‘ उतारणा’ तसा कठीणच.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)