मसुरे येथील अभिषेक धुरी कालवश.
युवा समाजसेवक हरपल्याने मसुरे परिसरावर शोककळा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील युवा समाजसेवक आणि साई कृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ मुंबई चे सदस्य, अभिषेक मोहन धुरी (वय ४०) यांचे सोमवारी रात्री उशिरा ठाणे (मुंबई) येथे रहात्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता ठाणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिषेक यांच्या निधनामुळे मसुरे गावात हळहळ व्यक्त होत आहे .
अभिषेक यांचे मसुरे गावच्या सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. सर्वांच्या मदतीला धावून जाणे व नेहमी हसतमुख राहून सर्वांना मदत करणे यासाठी मसूरे परिसरात अभिषेक ओळखले जात होते. कला क्रीडा नाट्य समाजसेवा या क्षेत्रातही अभिषेक यांचे मोठे योगदान होते. मसुरे गावातील धार्मिक उत्सवातही ते उत्साहाने भाग घेत असत. अडीअडचणीच्या प्रसंगी सर्वांच्या मदतीला ते निःस्वार्थीपणे धावून जात . त्यांच्या पश्चात आई पत्नी, काकी, चुलत भाऊ,चुलत बहीण असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)