ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>हिवाळे धनगरवाडी रस्ता खचला…….!</em>

<em>हिवाळे धनगरवाडी रस्ता खचला…….!</em>

प्रकाशन: 02 Jul 2022 11:01 PM
वाचन संख्या 224

भाजप भटक्या विमुक्त आघाडी मालवण तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांच्याकडून पाहणी…!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील हिवाळे धनगरवाडी येथील सुमारे चार किलोमीटर रस्ता नुकत्याच सुरू झालेल्या पहिल्या पावसातच ठिकठिकाणी वाहून गेला असून आता हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे नादुरुस्त बनला आहे. याबाबतचे वृत्त समजतात भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी पाहणी केली. येथील स्थानिक ग्रामस्थांशी रस्त्याच्या समस्या बाबत चर्चा करून याबाबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात जास्तीत जास्त सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन येथील ग्रामस्थांना दिले.
हिवाळे धनगरवाडी येथील सुमारे चार किलोमीटर अंतराचा हा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे. याबाबत येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही वेळा त्याची डागडुजी केली. तर काही मीटर रस्ता गतवर्षी डांबरीकरणही झाला. परंतु या वर्षी पावसाळ्यात उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून वाहतुकीस अयोग्य बनला आहे. या परिसरात सुमारे सव्वाशे ते दीडशे लोक वस्ती असून जिल्हा परिषद ची एक प्राथमिक शाळा पण आहे. या रस्त्यानेच येथील शालेय मुले, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, बाल, वृद्ध ग्रामस्थ, महिला, नेहमी ये जा करत असतात. याचा या सर्वांना मोठा त्रास होत आहे. या रस्त्याच्या प्रश्नाबाबत बाळा गोसावी यांना समजतात त्यांनी त्वरित या ठिकाणी जाऊन रस्त्याची पाहणी करून येथील ग्रामस्थांशी विचार विनिमय केला. तसेच त्वरित या प्रश्नासंदर्भात सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधणार असून रस्त्याला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच येथील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून आवाज उठविण्याचे आश्वासनही यावेळी बाळा गोसावी यांनी संबंधितांना दिले.
येथील स्थानिक ग्रामस्थांनी नुकतेच श्रमदानातून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली आहे. रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची गेले कित्येक वर्षाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
यावेळी येथील रामचंद्र जंगले,बाबुलाल शेळके, शैलेश मयेकर, रामचंद्र मसुरकर आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स