ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
चिंदर भटवाडी शाळेत कृषी दिन साजरा...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चिंदर भटवाडी शाळेत कृषी दिन साजरा...!

प्रकाशन: 01 Jul 2022 11:07 PM
वाचन संख्या 194

शनिवार आमचा स्पर्धेचा, शाळा चिंदर भटवाडी शिक्षकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधत चिंदर भटवाडी शाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघ्न बुटे यांचाही वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते कल्पवृक्ष रोपण करुन हा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सहशालेय उपक्रमाअंतर्गत शाळेत सुरू करण्यात आलेल्या ‘शनिवार आमचा स्पर्धेचा’ या उपक्रमाची सुरुवातही आजच्या प्रसंगी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात पालकांसाठीही एक गट असणार आहे. विजेत्यांना पालक पुरस्कृत बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार असून वर्ष अखेरीस बालआनंद मेळावा घेऊन पारितोषिक वितरण केले जाईल. रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन उपसरपंच दीपक सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रमाला मालवण पंचायत समिती माजी सभापती धोंडी चिंदरकर यांनी शुभेच्छा देत शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशीकांत नाटेकर, सह शिक्षिका- निशिगंधा वझे, संपदा पाताडे, आरोग्य सेवक-संतोष गोसावी, आरोग्य अधिकारी विवेक घाडगे, आरोग्य सेविका-सरीता जंगले, आशा सेविका-विनिता मसुरकर, सुनंदा अपराज, नंदिनी पावसकर, शशीकला पाताडे, चव्हाण, आबा पवार, रणजित दत्तदास, केळसकर,सुहास चिंदरकर ,परब तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स