मृदगंध साहित्य चळवळ आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत त्रिंबक हायस्कुलचे शिक्षक एकनाथ गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक..!
चिंदर | विवेक परब :
जागतिक पर्यावरण दिना निमित्त नागपूर येथील “मृदगंध साहित्य चळवळ” आयोजित पर्यावरण विषयक निसर्ग कवितांच्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जनता विद्या मंदिर त्रिंबकचे मराठी विषयाचे शिक्षक श्री. एकनाथ गायकवाड यांच्या “ओटि” या आनंदकंद वृत्ता मधील कवितेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या गायकवाड यांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.