ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मानव विकासच्या एसटी गाड्या पुर्ववत करा : अन्यथा आंदोलन छेडणार नासीर काझी यांचा इशारा…!

मानव विकासच्या एसटी गाड्या पुर्ववत करा : अन्यथा आंदोलन छेडणार नासीर काझी यांचा इशारा…!

प्रकाशन: 29 Jun 2022 09:16 AM
वाचन संख्या 51

वैभववाडी | नवलराज काळे :
वैभववाडी तालुक्यातील मानव विकासच्या सर्व एसटी गाड्या पूर्ववत करा व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिले आहे. गाड्या पूर्ववत न झाल्यास 1 जुलै रोजी तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशाराही काझी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी एसटी विभाग अधिकारी यांची राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
वैभववाडी तालुक्यातील शाळा, विद्यालये सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. परंतु मार्गावरील एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर काही विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने दाम दुप्पट आर्थिक भुर्दंड सोसत प्रवास करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेकडे वारंवार विचारणा करण्यात आली असून याबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे यापुर्वी सुरू असलेल्या मानव विकास व शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीच्या इतर गाड्या त्वरित सुरू कराव्यात असा इशारा निवेदनातून नासीर काझी यांनी दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स