आडवली येथे पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण संपन्न..!
चिंदर | विवेक परब :
आधार चॅरिटेबल ट्रस्ट,आडवलीचे संस्थापक अरुण भाई लाड यांच्या मार्फत, आडवली हायस्कुल येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी मालवण तालुक्यातील सुमारे ४५ उमेदवारांनी पोलिस प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
आडवली येथील या पोलीस प्रशिक्षणास आलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने कु. दिपाली राजेश परब रा. बांदिवडे हिने प्रशिक्षण, चहा अल्पोहार व जेवण मोफत देणारे, सामाजिक कार्यकर्ते व आधार ट्रस्टचे संस्थापक अरुण लाड आणि प्रशिक्षकांचे समाधानपुर्वक आभार मानले. तीन दिवसीय या प्रशिक्षणास, खास करुन मुंबईवरुन आलेले प्रशिक्षक, तसेच यादव हायस्कुलचे मुख्याद्यापक टि.डी. सकपाळ व सहकार्य करणारे आणि प्रशिक्षणार्थी या सर्वांचे अरुण लाड यांनी विषेश आभार मानत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)