ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी वैष्णवी भांगले हिची निवड

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी वैष्णवी भांगले हिची निवड

प्रकाशन: 24 Aug 2021 09:45 AM
वाचन संख्या 50

बांदा | राकेश परब : नुकत्याच अहमदाबाद गुजरात येथे घेण्यात आलेल्या ८ व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पयनशिप साठी सिंधुदुर्गच्या २ नेमबाजांची निवड झाली होती. त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
दोन्ही स्पर्धक १० मीटर पीप साईट प्रकारात सहभागी झाले.यात कु.शार्दुल सुधीर शिरसाट याने ४०० पैकी ३५३ गुण मिळविले तर कू. वैष्णवी गोविंद भांगले हिने ४०० पैकी ३७६ गुणांची नोंद केली.वैष्णवीने मिळवलेल्या गुणाच्या जोरावर तिची निवड राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली. हे दोन्ही खेळाडू बांदा येथील उपरकर शूटिंग रेंज वर सराव करतात.त्यांना प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील सहभाग तसेच यशाबद्दल या स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स