ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
धामापुरात अपघात ; काहीकाळ वाहतूक ठप्प..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

धामापुरात अपघात ; काहीकाळ वाहतूक ठप्प..!

प्रकाशन: 27 Jun 2022 08:08 PM
वाचन संख्या 405

चौके | अमोल गोसावी :
मालवण चौके – कुडाळ मार्गावर धामापूर येथे कुडाळहुन चौकेच्या दिशेने जाणारा ट्रक KA- 23
B- 4988 आणि चौके येथून चिरे वाहतूक करणारा डंपर KA-19, D-5561 यांच्यात समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. आज सोमवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ६ वाजता हा भीषण अपघात झाला.

Article image

या अपघातामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रसंगावधान राखून डंपर चालकाने बाजूला उडी मारल्याने त्याला दुखापत झाली नाही. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर केबिन मध्ये अडकलेला ट्रकचा चालक जखमी झाला असून स्थानिक तरुणांनी त्याला बाहेर काढून रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी कुडाळ येथे दाखल करण्यात आले आहे. मालवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस कॉ. सुनिल चव्हाण आणि सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अपघाताचा पंचनामा केला आणि स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स