ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण गावाने केला विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण गावाने केला विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार..!

प्रकाशन: 28 Jun 2022 12:12 PM
वाचन संख्या 189

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
गोळवण ग्रामपंचायतच्या खास ग्रामसभेत समाजात प्रचलित असलेली अनिष्ठ विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे सदर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.विधवा प्रथा बंद करून या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊया असे आवाहन यावेळी सरपंच सुभाष लाड यांनी केले.मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी गोळवण-कुमामे-डिकवल चे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार, श्री. शरद मांजरेकर, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. विभा परब, श्रीम. एकादशी गावडे, सौ. शिल्पा तेली, ग्रामसेविका सौ माधुरी कामतेकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीम. करुणा राणे, ग्रामरोजगारसेवक श्री. रामकृष्ण नाईक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, जि. प. शाळा मुख्याध्यापक, उपशिक्षक, आरोग्य सेविका, कृषी सहाय्यक, तसेच गाव गोळवण, कुमामे व डिकवल येथील सुमारे १७५ ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स