ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळ या संस्थेमार्फत गणपतीपुळे आणि मालगुंड येथे महिलांसाठी विविध कार्यशाळा आणि आरोग्य शिबिर संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळ या संस्थेमार्फत गणपतीपुळे आणि मालगुंड येथे महिलांसाठी विविध कार्यशाळा आणि आरोग्य शिबिर संपन्न..!

प्रकाशन: 26 Jun 2022 12:38 PM
वाचन संख्या 67

शिरगाव/संतोष साळसकर :
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि मालगुंड या ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळ या संस्थेमार्फत येथील महिलांसाठी केक बनविणे,नील फिनेल बनविणे,वॉशिंग पावडर बनविणे,मेणबत्ती तयार करणे,आणि मसाल्याचे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.तसेच व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा, महिलांसाठी आरोग्य शिबिरात महिलांच्या हाडांची तपासणी करण्यात आली.यावेळी कोल्हापूर येथील मोरया हॉस्पिटल चे प्रसिद्ध डॉ. संतोष निंबाळकर यांनी महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

Article image


यावेळी महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळ या संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रिया आयरेकर, डॉ. संतोष निंबाळकर,नीलम जोगडे,शोभा कांबळे,गणपतीपुळे – सरपंच कल्पना पकये,उपसरपंच महेश केदार,ग्रामविकास अधिकारी श्री चौधरी, ग्रा. पं. सदस्य सारिका भिडे,मृणाल घनवटकर, शुभांगी ठावरे, संजय माने, राज देवरुखकर, मालगुंड- ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक दुर्गवळी,उपसरपंच अमित पाटील,ग्रामविकास अधिकारी नाथा पाटील आदींसह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन श्री. चौधरी यांनी तर आभार सौ. प्रिया आयरेकर यांनी मानले.या संस्थे मार्फत गेले काही दिवस अशाच प्रकारचे महिलांच्या आर्थिक स्त्रोत वाढवा,त्यांचे रहाणीमान आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहतील. स्वतःच्या संसाराला, कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहेत. या शिबिराना महिला वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. याचा खूप आनंद वाटत आहे असे या संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रिया आयरेकर यांनी बोलताना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स