ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार…</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार…</em>

प्रकाशन: 23 Jun 2022 03:08 PM
वाचन संख्या 26

संजय राऊतांचे संकेत; बंडखोर आमदारांना २४ तासात परत येण्याचे आवाहन…

वैभववाडी |प्रतिनिधी – शिवसेनेने महाविकास आघाडीत तून बाहेर पडावे, अशी जर बंडखोर आमदारांची मागणी असेल, तर त्यांनी २४ तासात परत येऊन मुख्यमंत्र्यांकडे आपली अधिकृत भूमिका मांडावी, आम्ही त्यासाठी तयार आहोत, अशी गुगली खासदार संजय राऊत यांनी आज येथे मांडली. दरम्यान शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्यास तयार आहे, असेही त्यांनी संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊत बोलत होते. ते पुढे म्हणाले, बंडखोरी केलेल्या आमदारांची जर शिवसेनेने भाजपासोबत युती करावी अशी इच्छा असेल, तर ती भूमिका मी नक्कीच स्वीकारु. मात्र त्यांनी पत्रव्यवहार ट्विट किंवा मोबाईलवर संदेश पाठवून आपली भूमिका मांडू नये. त्यांनी २४ तासांच्या आत मुंबईत येऊन आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडावे, त्यांची मागणी नक्कीच पूर्ण केली जाईल, असे सांगत शिवसेना महाविकास आघाडीची साथ सोडेल, असे नवे संकेत दिले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स