ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
" यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी " - प्रा. राजाराम परब .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

" यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी " - प्रा. राजाराम परब .

प्रकाशन: 23 Jun 2022 03:54 PM
वाचन संख्या 26

काळसे येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन…!

चौके | प्रतिनिधी :
” यशस्वी व्हायचं असेल तर परिस्थितीच्या छाताडावर पाय देउन उभ राहता आलं पाहिजे, परिस्थितीच रडगाणं न सांगता आलेल्या परिस्थितीवर मात करून विजय मिळवा. यशामध्ये हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जावू नका. यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी. तुम्ही किती बुद्धिमान किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्या कामात किती सातत्य आहे यावरून तुमचे यश ठरत असते. तसेच तुमची परिस्थिती कशी असली तरी चालेल यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्वाचं आहे. ” असे प्रतिपादन परफेक्ट ॲकॅडमी कुडाळचे चेअरमन प्रा. राजाराम परब यांनी काळसे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नुकतेच श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला , वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. राजाराम परब यांनी स्पर्धा परिक्षेत तसेच शालेय परिक्षांमध्ये कसे यशस्वी होता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले.
यावेळी संस्था अध्यक्ष हेमंत परब , उपाध्यक्ष योगेश राऊळ ,सचिव केशव सावंत , दाजी परब संचालक तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, निवृत्त तहसीलदार शरद गोसावी , राजन प्रभु , गजानन प्रभु, सुवर्ण काळसेकर, अध्यापक विद्यालय आजगावचे प्राध्यापक रूपेश पाटील , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , हितेंद्र काळसेकर आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने प्रा. राजाराम परब यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स