ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>व्ही.एन.नाबर स्कूल मध्ये एम. एस.एफ.सी.सारखा उपक्रम अतिशय स्तुत्य..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>व्ही.एन.नाबर स्कूल मध्ये एम. एस.एफ.सी.सारखा उपक्रम अतिशय स्तुत्य..!</em>

प्रकाशन: 20 Jun 2022 02:16 PM
वाचन संख्या 75

आर्किटेक्ट संतोष सावंत यांचे प्रतिपादन..!

बांदा | राकेश परब :
बांद्या सारख्या ग्रामीण भागात व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.एफ.सी सारखा तंत्र विषय आठवी ते दहावी मधील मुलांना शिकवण्यात येत आहे. शाळेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन भाजप तालुका कार्यकारणी सदस्य श्री. संतोष सावंत यांनी एस एस.एफ,सी, विभागाच्या आठवीतील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात बोलताना केले. संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही निवडक शाळेत हा तंत्रज्ञान विषय शिकवला जातो. या व्ही.एन.नाबर शाळेतील विद्यार्थी खरचं भाग्यवान आहेत की या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तंत्रज्ञान सारखा विषय शिक्षणात मिळत आहे. इंजिनिअरिंग, आय.टी.आय, हाॅटेल मॅनेजमेंट,सारख्या महाविद्यालयात प्रवेश घेताना या विषयाचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होत आहे.

Article image
Article image
Article image


एन.एस.क्यु,एफ,सारखे तंत्रशिक्षणाचे अभियान संपूर्ण देशात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केले आहे.या विषयाचे विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत भाजप तालुका उपाध्यक्ष, बांदा मंडल श्री.सिद्वेश पावसकर यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती शीतल राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.श्वेता कोरगावकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश पावसकर,भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष सावंत
भाजपा सोशल मीडिया हेड सावंतवाडी तालुका बाबा काणेकर, भाजपा तालुका मंडल सदस्य आबा धारगळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, विभाग प्रमुख सौ.रिना मोरजकर, उपस्थित होते.

Article image


आजच्या स्पर्धेच्या युगात नुसते पुस्तकी शिक्षण न घेता आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणारे एस.एस.एफ.सी. सारखे विषय विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजेत आणि हे शिक्षण आज काळाची गरज बनली आहे असे मत मनोगतातुन बोलताना माजी सभापती शीतल राऊळ यांनी केले.
आजपासून आठवी मधील मुलांना हा विषय शिकण्यास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विषय शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली असल्याचे मत यावेळी माजी जि.प.सदस्या सौ.श्वेता कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून व्यक्त केले. तसेच या विषयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मुलांना भेट वस्तू व गोड खाऊ वाटप करुन मुलांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ.रिया देसाई, श्री.भिकाजी गिरप, यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, सुत्रसंचालन समन्वयक श्री. राकेश परब यांनी तर आभार शेवटी सौ.गायत्री देसाई यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स