<em>कोटकामते येथील संदीप कामतेकर यांचे मुंबई येथे निधन..!</em>
शिरगाव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील कोटकामते येथील प्रतिष्ठित रहिवासी संदीप हरिश्चंद्र कामतेकर ( ५० वर्ष ) यांचे बुधवार दिनांक १५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता विरार – कुलपाडा येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी,मावशी,भाचे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव हसतमुख आणि मनमिळाऊ होता. त्यांचा मुळगाव कोटकामते असला तरी ते विरार – कुलपाडा येथे रहात असत. गेले कित्येक महिने ते आजारी होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)