ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नाटळच्या जंगलात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नाटळच्या जंगलात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण..!

प्रकाशन: 19 Jun 2022 07:21 PM
वाचन संख्या 275

ग्रामविकास मंडळाचा स्तुत्य उपक्रम..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामविकास मंडळ, नाटळ आणि राजवाडी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणचा कार्यक्रम नाटळच्या जंगल भागात आयोजित केला होता. उपाध्यक्ष भालचंद्र सावंत, यांच्या हस्ते वृक्ष रोप लावून शुभारंभ झाला. वड, पिंपळ, आंबा, कोकम, फणस बिया, करवंदे कलम, पेरू, उंबर, सुरंगी, काजरा, अर्जुन, तिरफळ, रक्तरोहिडा ही बहुपयोगी झाडे लावली.

Article image

यावेळी मुलांसोबत वनविभागाचे वनरक्षक  तसेच प्रकाश राणे, रावजी गावकर, मिलिंद सावंत, अजय सावंत, सौ. आणि श्री. ओंकार सावंत भालचंद्र सावंत, तुषार सावंत, जयवंत सावंत, आदित्य-अदवैत-सिद्धांत आणि ग्रामविकास मंडळ, नाटळचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत तसेच आनंद तांबे व सुनील मेस्त्री हे शिक्षक सहभागी झाले होते.मुलांना पर्यावरण विषयक  माहिती शिक्षक सुनील मेस्त्री यांनी दिली.

Article image


जयवंत सावंत यांनी ग्लोबल वॉर्मिंगचे मानवी जीवनावर होणारे परिणाम सांगितले.
वनविभागाचे चव्हाण मॅडम, श्री गुडेकर आणि श्री राठोड यांनी कोकण आणि मराठवाडामधील पर्यावरण यातील फरक सांगितला. वृक्षारोपण कार्यक्रमाने पुस्तकाबाहेरील धडा आज मुले हसतखेळत शिकली असे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष विश्वनाथ सावंत म्हणाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स