<em>रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणचे शालांत परिक्षेत दैदिप्यमान यश..!!</em>
मालवण । प्रतिनिधी :
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या शालांत परिक्षेमध्ये कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे.
या प्रशालेतील एकूण ७९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते.
त्यापैकि ६५ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये (distinction) तर १४ विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये (first class) उत्तिर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. इश्वरी उदय बागवे हीने ९५.६०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
तर कु. भुमी संदिप देऊलकर, कु. तनिषा अनिल गांवकर, कु. आर्या मच्छिन्द्र गवारे हीने ९४.६०% गुण मिळवत संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक पटकावला.
कु. प्रथमेश नितिन आचरेकर या विद्यार्थ्याने ९३.८०% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
प्रशालेची प्रतिवर्षी दैदिप्यमान यशाची परंपरा या विद्यार्थ्यांनी यावर्षीदेखील कायम राखली.
याबद्धल सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, पालकांचे, कर्मचारीवृंदांचे व प्राचार्य फादर ऑल्विन गोन्साल्विस यांचे..
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व खूप सा-या शुभेच्छा..!!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)