ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एस बी सी राज्य संघर्ष समितीच्या उपाध्यक्षपदी सुरेश बापर्डेकर यांची नियुक्ती..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

एस बी सी राज्य संघर्ष समितीच्या उपाध्यक्षपदी सुरेश बापर्डेकर यांची नियुक्ती..!

प्रकाशन: 12 Jun 2022 02:26 PM
वाचन संख्या 51

मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली गावचे सुपुत्र श्री.सुरेश बापर्डेकर यांची विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती राज्य संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. सुरेश बापर्डेकर हे गाबीत समाजा चे १९८५ पासून काम करत आहेत.गेली २००६ पासून या संघटनेचे कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. विशेष मागास प्रवर्ग या महाराष्ट्र संघटनेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्य संघटने वरती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शशिकांतजी आमने आणि सरचिटणीस श्री बालाजी चिनके कार्याध्यक्ष श्री.दत्ताभाऊ चेचर,मार्गदर्शक श्री.सखाराम मालाडकर,श्री.अरुण सरवदे यांनी श्री. सुरेश बापर्डेकर यांची उपाध्यक्षपदी निवड घोषित केली . बापर्डेकर हे अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघ यांचे सरचिटणीस असून सामाजिक कार्यकर्तेही आहेत . बापर्डेकर यांनी समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक श्री.सखाराम मालाडकर ,श्री शंकर पोसम श्री.विजय राऊळ आणि अन्य यांच्यासोबत आज पर्यंत बऱ्याच आंदोलन, मोर्चा ,उपोषणे आणि जाहीर सभा यामध्ये सक्रिय भाग घेतला आहे . दिल्ली पासून गल्ली पर्यंत समाजातील बराच अडचणीला शासन दरबारी न्याय मागणे आणि त्याचे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून समस्या निवारण करत आहेत . गाबीत समाजातील मुलांना जातीच्या दाखल्यासाठी येणाऱ्या समस्या ,अडचणी काय आहे आणि त्यावर काय बाजू मांडावी हे समजून घेऊन स्वतः अधिकाऱ्यांसमोर दाखले मिळावेत यासाठी प्रयत्न करत असतात.
बापर्डेकर हे गाबीत समाजातील असून त्यांचा एकच ध्यास ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचा आपण काही तरी देणे लागतो त्याकरिता जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत समाजाचे काम करत राहील पाहिजे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स