ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
धामापूर पेठवाडीत सोनेरी कोल्ह्याला वनविभागाकडून जीवदान...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

धामापूर पेठवाडीत सोनेरी कोल्ह्याला वनविभागाकडून जीवदान...!

प्रकाशन: 12 Jun 2022 08:29 PM
वाचन संख्या 317

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मालवण तालुक्यातील मौजे धामापूर पेठवाडीतील दिनेश काळसेकर यांच्या विहीरी मध्ये पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाने सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वनविभागाला कळविले. वनपरिक्षेत्र कुडाळ चे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत 15 ते http://localhost/news/public/uploads/20 फूट खोल विहिरीतून त्यास सुखरूप बाहेर काढले.

Article image


भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या या विहिरीत वन्यप्राणी कोल्हा आत मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री . अमृत शिंदे यांनी सांगितले.
पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केल्याने तो पाण्याबाहेर येताच त्या बिळामध्ये जात असलेने अडचण येत होती. अखेर अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकास यश आले.
श्री शिंदे म्हणाले ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने या सोनेरी कोल्ह्याचा जीव वाचवता आला. त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक करण्यात आले .
सदर वन्यप्राणी सोनेरी कोल्ह्या याचे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक श्री.दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे , वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर श्री शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने यशस्वी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स