ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>फोंडाघाट येथे दोन कंटेनरचा भीषण अपघात..!</em>

<em>फोंडाघाट येथे दोन कंटेनरचा भीषण अपघात..!</em>

प्रकाशन: 11 Jun 2022 01:58 PM
वाचन संख्या 71

कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प…

फोंडा | प्रतिनिधी :
फोंडाघाट बस स्टँडच्या वरील उतारावर दोन कंटेनरट्रकची आज सकाळी ६.४५ वा. च्या दरम्यान समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. यामुळे कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळीच झालेल्या अपघातामध्ये कोल्हापूरच्या दिशेने भंगार घेऊन जाणारा कंटेनरट्रक (एनएल०१ एबी ५८३७) व कणकवली वरून गोवाला पॅकिंग पॉलिथिन मटेरियल घेऊन जाणारा कंटेनरट्रक (आरजे११ जीसी ०४२१) यांची फोंडाघाट बसस्थानकच्या वरील उतारावर समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही ट्रकचे एक्सेल पार्ट तुटल्याने पुढील दोन ते तीन तास वाहतूक मोकळी करण्यास गेले. सकाळीच कामावर जाणाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स