<em>ग्राहक पंचायत वेंगुर्ले कडून वेंगुर्ले नुतन पोलीस निरीक्षक मा.अतुल जाधव यांचे काजू रोप,गुलाब पुष्प देऊन स्वागत….!</em>
चिंदर/विवेक परब :
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वेंगुर्ले शाखेतर्फे वेंगुर्ले शहरात अलिकडेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक मा.अतुल जाधव यांना पोलीस स्टेशन वेंगुर्ले येथे काजू रोप व गुलाब पुष्प देऊन वेंगुर्ले येथील भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ग्राहक पंचायत वेंगुर्लेचे तालुकाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, सल्लागार सदस्य निवृत्त गटविकास अधिकारी सुनील रेडकर, सर्पमित्र महेश राऊळ, डॉ.शिवाजी चव्हाण, बचत गट अध्यक्षा सौ.सुजाता पडवळ, नेहरू युवा केंद्र वेंगुर्ले समन्वयक कु.श्री हर्षा टेंगशे उपस्थित होते.
ग्राहक संघटना मजबूत होणे आवश्यक असुन आपल्या परीने आपले सतत सहकार्य आपल्या संघटनेला राहणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)