सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन व्यवसाय वाढीसाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्री श्रीपादजी नाईक 13 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर मालवण येथे पर्यटन व्यवसायिकांच्या अडीअडचणी समजून घेणार- विष्णू मोंडकर...
जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन..!
चिंदर | विवेक परब –
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकार ने मान्यता दिली आहे तसेच केंद्र सरकारने शाश्वत पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता देऊनही दोन दशकांपेक्षा जास्त काळ होऊनही आवश्यकती नियमावली व प्रशासकीय मदत जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांस झाली नाही. जिल्ह्यातील पर्यटन कुठल्याही शासकीय मदतीशिवाय आतंरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यासायिकांचा मोठा हातभार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांच्या अडीअडचणी समजून त्यावर केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्री श्रीपादजी नाईक सोमवार दिनांक 13 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता हॉटेल चिवला बीच मालवण येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या समजून घेणार आहेत तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पासंबधी माहिती घेणार आहेत. जिल्ह्यामध्ये सागरी पर्यटनाच्या सोबत कल्चर , हिस्ट्री, मेडिकल,फूड, जलक्रीडा,
साहसीक्रीडा, ऍग्रो टुरिझम क्षेत्रात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना,अपेक्षित आवश्यक त्या सोयी सुविधा, आवश्यक शासकीय अध्यादेश तसेच रस्ते, पाणी, वीज या दळणवळणाच्या साधनामध्ये केंद्र सरकार ने आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील होमस्टे, जलक्रीडा, हॉटेल, टूर तसेच सर्व प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांनि सदर कार्यक्रमात उपस्थित राहून जिल्ह्यात पर्यटन वाढींसाठी येत असलेल्या समस्या तसेच आवश्यक सरकारी मदत विषयी मागणी करावी असे आवाहन श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)