ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
 वराड येथे शेती अवजार देखभाल व दुरुस्तीविषयी मार्गदर्शन..!

 वराड येथे शेती अवजार देखभाल व दुरुस्तीविषयी मार्गदर्शन..!

प्रकाशन: 10 Jun 2022 03:46 PM
वाचन संख्या 50

महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतिने आयोजन…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील वराड येथे शेती अवजारांची देखभाल व दुरुस्तीविषयीच्या प्रशिक्षणाचे आयोजन ,
गुरुकृपा कृषि सेवा केंद्र, येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगामाच्या शेती अवजारांची देखभाल व दुरुस्ती या विषयीच्या सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Article image
Article image

तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी व कृषि अधिकारी दिनेश लंबे यानी कृषि विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेचा लाभ शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवरुन लाभार्थ्यास कशाप्रकारे घेता येतो याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यानंतर किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. पुणे प्लांटचे तंत्रज्ञ श्री. आकाश होंडे व तळगाव येथील शेती अवजारांचे मॅकॅनिक आकाश दळवी यांनी शेती अवजारे जसे की पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रासकटर, चेनसॉ, इ. यंत्रांच्या हाताळणीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, कृषि अधिकारी दिनेश लंबे, कृषि पर्यवेक्षक धनंजय गावडे, कृषि पर्यवेक्षक धामापूरचे सिताराम परब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि सहाय्यक सुषमा धामापूरकर, गुरुकृपा कृषि सेवा केंद्राचे मालक सतिश वंजारी,  आत्मा शेतकरी सल्ला समिती सदस्या उज्ज्वला दळवी, ग्रामपंचायत सदस्य सोमा परब आदी व आसपासच्या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि पर्यवेक्षक मंदार सरमळकर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गुरुकृपा कृषि सेवा केंद्राचे सतिश वंजारी व कर्मचारी यांचे बहुमोल असे योगदान लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स