ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...!

बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा...!

प्रकाशन: 10 Jun 2022 10:10 AM
वाचन संख्या 24

बांदा |राकेश परब :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या नाटिकामधून विद्यार्थ्यांना छत्रपतींचे विचार देऊन प्रेरित करा. तरच खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य व विचार हे प्रत्येकाच्या मनामानात व घराघरात पोहोचतील असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस यांनी येथे केले.

Article image


येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने बांदा येथे आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात श्री गवस प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक व धार्मिक पद्धतीने सावंतवाडी संस्थांनाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनिल गवस यांनी उपस्थिताना शिवविचारांवर मार्गदर्शन केले. त्यांनी इतिहासातील विविध विषयांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलुंचे, त्यांच्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनाचे दाखले यावेळी दिलेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट शासक
छत्रपती शिवाजी महाराज हे रायतेचे राजे होते. ते उत्कृष्ट शासक तर होतेच. मात्र रायतेच्या मनातील जाणणारे जाणते राजा होते. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच स्वराज्याचा विस्तार झाला. त्यांचे कार्य व विचार आताच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितले.
. कार्यक्रमाचे प्रात्ताविक भूषण सावंत यांनी केले. सूत्रसंचालन रीना मोरजकर यांनी केले तर आभार समीर परब यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, संस्थेचे अध्यक्ष ऍड विठ्ठल परब, सचिव अनुज बांदेकर, उपाध्यक्ष तेजस परब, निलेश मोरजकर, केदार कणबर्गी, प्रशांत गवस, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, संतोष मंझिलकर, जयेश म्हाडगूत, निलेश सावंत, निखिल तानावडे, अजय आरोसकर, रंगनाथ परब, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, शुभेच्छा सावंत, दिक्षा गवस, आर्या पवार आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स