ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>पर्यटक मंत्रालया मार्फत दोन दिवसाची कार्यशाळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात-सहसंचालक वेंकटेशन धट्टारेन..</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>पर्यटक मंत्रालया मार्फत दोन दिवसाची कार्यशाळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात-सहसंचालक वेंकटेशन धट्टारेन..</em>

प्रकाशन: 10 Jun 2022 08:37 AM
वाचन संख्या 40

चिंदर | विवेक परब :
पर्यटन क्षेत्रातील होणारे बदल आणि त्यादृष्टीने करावयाचे उपाय योजना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटक मंत्रालयामार्फत दोन दिवसाची कार्यशाळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहसंचालक वेंकटेशन धट्टारेन यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या मुंबई येथील कार्यालयाला भेट देऊन व्यंकटेशन यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विस्तार संदर्भात चर्चा केली. त्यावेळी व्यंकटेशन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहाय्यक संचालक जगदीप ठोंबरे भावना शिंदे उपस्थित होत्या .यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी निवास न्याहारी योजना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टूर ऑपरेटरना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात अनेक प्रकारे वाढ करता येऊ शकते. त्यादृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयामार्फत वेळोवेळी सहाय्य केले जाईल असे श्री वेंकटेशन यांनी यावेळी सांगितले. दाभोळकर यांनी सोशल मीडियाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ओळख देशवासियांना सनवी सर्व जगातील पर्यटकांना करून दिल्याबद्दल व्यंकटेशन यांनी दाभोळकर यांचा सत्कार यावेळी केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स