ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डाॅ. व्ही.के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल ९७.११ टक्के निकाल..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डाॅ. व्ही.के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल ९७.११ टक्के निकाल..!

प्रकाशन: 08 Jun 2022 08:30 PM
वाचन संख्या 42

बांदा | राकेश परब :
बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. ही. के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.११ टक्के लागला. ३८० पैकी ३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्राजक्ता मुकुंद डुगल (५४६ गुण ९१ टक्के ) ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विज्ञान शाखेचा अथर्व प्रदीप देसाई (५४० गुण ९० टक्के ) व अकाउंटिंग शाखेची नम्रता पदमलोचन सावंत (५३८ गुण ८९.६७ टक्के ) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला. प्रशालेने यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ मिलींद तोरसकर, सचिव कल्पनाताई तोरसकर,प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर व मुख्याध्यापक तथा समन्वय समिती सहसचिव लक्ष्मण पावसकर यांनी विशेष अभिनंदन केले
प्रशाळेमधून विज्ञान शाखेतून १२४ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. या शाखेतून प्राजक्ता डुगल (५४६ गुण ९१ टक्के ), अथर्व प्रदीप देसाई (५४० गुण ९० टक्के ), अथर्व श्रीकांत महाबळ (५१६ गुण ८६ टक्के ).
कला शाखेतून ९८ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९१.८४ टक्के लागला. या शाखेतून सिद्धी शशिकांत सावंत (४८४ गुण, ८०.६७ टक्के ), लीना अरुण सावंत (४३१ गुण ७१.८३ टक्के ), पूजा अशोक गावडे (४२८ गुण, ७१.३३ टक्के ).
वाणिज्य शाखेतून १०३ पैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.०५ टक्के लागला. या शाखेतून अनुष्का आनंद गवस (४७४ गुण ७९ टक्के ), प्राजक्ता रामदास गडकरी (४७० गुण ७८.३३ टक्के ), सुषमा संदीप सावंत (४६५ गुण, ७७.५० टक्के ).
व्यावसायिक शाखेतून ५५ पैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.१८ टक्के लागला. हॉर्टिकल्चर शाखेतून आशिष राजेंद्र मोरजकर (३६९ गुण ६१.५० टक्के ), निखिल लक्ष्मण गडकरी (३२३ गुण ५३.८३ टक्के ), मयुरेश महादेव कानसे (२८९ गुण ४८.१७ टक्के ). अकाउंटिंग अँड ऑडिटिंग शाखेतून नम्रता पदमलोचन सावंत (५३८ गुण ८९.६७ टक्के ), सुकन्या किशोर गवस (४७९ गुण ७९.८३ टक्के ), संकेत दत्ताराम कवठणकर (४६७ गुण ७७.८३ टक्के ). एमआरईडीए शाखेतून रोशन रवींद्र केरकर (४६७ गुण, ७७.८३ टक्के ), दीपेश दिगंबर कुडव (४६१ गुण ७६.८४ टक्के ), वसंत सखाराम म्हावळणकर (४३२ गुण ७२ टक्के ) हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था पदाधिकारी,पालक शिक्षक, व माजी विद्यार्थ्यांनि अभिनंदन केले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 258
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स