ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत केली-अनिल शिंगाडे..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत केली-अनिल शिंगाडे..

प्रकाशन: 07 Jun 2022 08:43 AM
वाचन संख्या 151

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपा दिंव्याग विकास आघाडी चा उपक्रम ...!

चिंदर/विवेक परब :
भाजपा दिंव्याग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने मोदी सरकारच्या यशस्वी अष्ठवर्षपुर्ती निमीत्त दिव्यांगासाठी मोदी सरकारने केलेले भरीव काम व नवनवीन योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माहिती देताना अनिल शिंगाडे यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे सर्व दिव्यांगांच्या वतीने आभार मानले , कारण “दिंव्याग” हा शब्दच मुळात मोदीजींनी आणला, त्यामुळे अपंगांना सार्वजनिक जीवनात ताठ मानेने उभे रहाता आले. त्याचप्रमाणे यापूर्वी फक्त मतिमंद, शारीरिक अपंग, अंध व कर्णबधीर असे चारच अपंगत्वाच्या मुलांनाच प्रमाणपत्र मिळत होते परंतु पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी २८ एप्रिल २०१६ रोजी ऑटीस्टीक मुलांनाही असे प्रमाणपत्र देण्यात यावे असे जाहीर केले. तसेच दिव्यांगांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी नॅशनल हॅडीकॅप फाईनंस ॲंड डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडुन ५ लाख रुपयांपर्यंत बिझनेस लोन सुरू केले. दिव्यांगजनासाठी शादी विवाह प्रोस्ताहन योजना सुरू केली.आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींबद्दल अत्यंत सहानुभूती दाखवून, सरकारने दि राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज विधेयक २०१६ मंजूर करून कायदेशीर चौकट मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ अपंगांना मान्यता देऊन, पूर्वीच्या ७ मध्ये मोठी सुधारणा करून, सरकारने अपंगत्वावर उपचार केले आहेत. काळानुसार गतिमान संकल्पना म्हणून. भाषण आणि भाषिक अपंगत्वाची भर घातली गेली ज्याकडे यापूर्वी लक्ष दिले गेले नव्हते, त्यामुळे अधिकाधिक दिव्यांग लोकांना सरकारच्या कार्यक्रमांच्या कक्षेत आणले जाते.
महत्त्वाचे म्हणजे, दिव्यांग मुलांसाठी (६-१८ वर्षे) मोफत शिक्षणाचा अधिकार हा आणखी एक मोठा विकास आहे. त्यानंतर, उच्च शिक्षण संस्थांमध्ये 4% जागांचे आरक्षण देण्याव्यतिरिक्त, दिव्यांगांवर केलेल्या गुन्ह्यांसाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मोदी सरकारने अंत्योदय योजनेमध्ये बदल करुन प्रत्येक दिव्यांग कुटुंबाला प्रती महीना ३५ किलो धान्य मंजूर केले. त्याचप्रमाणे दिव्यांगासाठी नवीन पेंशन योजना सुरू केली २७ डिसेंबर २०१६ ला मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदा केला व पुर्वीच्या कायद्यात बदल व सुधारणा केली. त्यामुळे दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत झाली.
यावेळी भाजपा दिंव्याग विकास आघाडी चे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट, सदानंद पावले, उदय भोगावकर, विठ्ठल शिंगाडे,बाबुराव गावडे, दिक्षा तेली, शेखर आळवे, सविता गावडे, सेजल आळवे, मारुती शेटये, सुवर्णा वरक, प्रीया सावंत, रीतेश तेली, जोस्ना राणे, तन्मयी तेली , सरीता लोके, विजय गोसावी, सुधीर चव्हाण, वृषाली कांबळे, संगीता पवार, प्रीतम मठकर, प्रशांत कदम इत्यादी दिंव्यांग उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स