<em>चिंदर ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा…..!</em>
चिंदर |विवेक परब :
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणा स्थान आहेत. राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषाचा लोककल्यानकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ६जून १६७४ म्हणजेच राज्यभिषेक दिन हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन रहावे म्हणून महाराजांनी या दिवशी स्वतःचा राज्यभिषेक करुन घेतला व शिवाजी महाराज छत्रपती झाले. स्वराज्याचे सार्वभौमत्व रायगडच्या राज्यसदरेवरुन घोषित झाले. याच दिवशी शिवशकाची निर्मिती करुन महाराज शककर्ते हि झाले व शिवकालगणनेचा प्रारंभ झाला. तोच हा शुभदिन होय.
यावर्षी पासून महाराष्ट्र शासनाने ६ जून हा "शिवस्वराज्यदिन" म्हणून साजरा करण्याचे ठरवले. आज मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत येथे "स्वराज्य गुढी" उभारुन व महाराष्ट्र गीत गाऊन उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविस्तार अधिकारी साळसकर, रांगोळीकार-विशाल गोलतकर, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर, अजित पाडावे, आबा पवार, योजना माळगांवकर, रणजित दत्तदास, मसुरकर, गोलतकर, पिंट्या जंगले, अमृता तोरसोळकर, लब्दे, आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)