दर्पण प्रबोधिनिकडून सोनाली कदमचे अभिनंदन..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
एमपीएससी परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने सिंधुकन्या कु.सोनाली सुरेश कदम हिला प्रशासकिय कामकाजाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दर्पण प्रबोधिनी अध्यक्ष आयु.आनंद तांबे,माजी अध्यक्ष आयु.राजेश कदम,सदस्य नितीन नागवेकर, सोनालीचे आई वडिल उपस्थित होते.सोनाली आपल्या यशाबद्दल बोलताना म्हणाली, सतत १२ ते १४ तास अभ्यास,पुणे येथील भागीरथी संस्थेचे अनमोल मार्गदर्शन, आई बाबांची प्रेरणा यामुळे हे यश संपादन करू शकले.आपल्याकडील मुलांमध्ये जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची तयारी असेल कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतील असेही सोनालीने आवर्जून सांगितले.तिच्या या दैदिप्यमान यशप्राप्ती बद्दल दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या वतीने अध्यक्ष आनंद तांबे यांनी अभिनंदन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)