<em>बांद्यात रोटरी क्लबच्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद..!</em>
बांदा | राकेश परब :
बांदा येथे रोटरी क्लब ऑफ बांदा व व्हीजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.तब्बल 357 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन व्हीजन आरएक्स लॅबच्या डॉ. लिप्सा उडवाडिया यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ,ऱोटरी जीएसआर आनंद रासम ,रोटरीयन अँड. सिद्धार्थ भांबुरे,प्रेसिडेंट मंदार कल्याणकर,रोटरीयन तथा माजी सभापती प्रमोद कामत,बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील,सेक्रेटरी फिरोझ खान, खजिनदार बाबा काणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री धन्वंतरी यांच्या मुर्तीला पुषहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक मंदार कल्याणकर यांनी केले.डॉ.जगदीश पाटील यांनी रोटरीच्या या शिबिराबाबत माहीती दिली तसेच लवकरच अपंगांसाठी जयपुर फुटचे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रमोद कामत यांनी सांगितले की आज सर्व रुग्णांची तपासणी होईल व नंतर चष्मे बनवून मोफत वितरण होईल.तसेच मोतीबिंदू रुग्णांबाबतही नंतर व्यवस्था करण्यात येईल. यावेळी डिंगणे येथे वीज पडून घराचे नुकसान झालेल्या रेश्मा डिंगणेकर यांना रोटरीतर्फे पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली.स्वागत बाबा काणेकर यांनी तर आभारप्रदर्शन फिरोझ खान यांनी केेले.
यावेळी तपासणीसाठी व्हीजन आरएक्स लॅबच्या डॉ. लिप्सा उडवाडिया सिएसआर वर्कचे विनय भंडारी,डोळ्यांचे डॉ.दिपाली,डॉ.प्रिया,मनस्वी आदींचे पथक मुंबईहून आले होते.डॉ.गोकर्ण पणशीकर यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले.
वय वर्षे ४० च्या पुढील व्यक्तींच्या नेत्र तपासणीसाठी या शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या शिबिरासाठी शितल राऊळ, सुदन केसरकर,संजय शिरोडकर, सुधिर शिरसाट, स्वप्निल धामापुरकर , आबा घारगऴकर, आपा चिंदरकर,सिद्धेश पावसकर, सुनिल राऊळ,स्वागत नाटेकर, प्रविण शिरसाट , संदिप देसाई , रत्नाकर आगलावे, दिलिप कोरगावकर, संतोष सावंत,मनसुख वसानी,डॉ.भालचंद्र कोकाटे, तुषार धामापुरकर, सचिन मुळीक, दिगंबर गायतोंडे आदींसह अनेक रोटरीयन उपस्थित होते.
बांदा दशक्रोशीतील शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)