ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा..!

कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा..!

प्रकाशन: 05 Jun 2022 05:23 PM
वाचन संख्या 77

नाधवडे येथे केले वृक्षारोपण

वैभववाडी |नवलराज काळे : कृषी महाविद्यालय सांगुळवाडी बीएससी ऍग्री च्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कार्यानुभव) उपक्रमांतर्गत रविवारी नाधवडे येथे वृक्षारोपण केले. याप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाधवडे सरपंच आदिती नारकर होत्या तसेच यावेळी उपसरपंच सूर्यकांत कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय तावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे व जेष्ठ नागरिक महादेव कुडतरकर व ग्रामपंचायत सदस्य लीना ताई पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग पावसकर, माजी उपसभापती बंडू मांजरेकर व इतर मान्यवर त्यासोबत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच पोलीस नाईक अमलदार राहुल पवार हे उपस्थित होते. सुधीर नकाशे व प्रमुख पाहुन्यांनी शेतकरी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय सांगूळवाडी येथील विद्यार्थी ओंकार निकम, शुभम काळोखे, अक्षय डुकरे, सुहास पवार, अक्षय थोरात, मयुरेश सानप, शुभम गायकवाड, तेजस जाधव व रोहित पैलवान यांनी केले. ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तेजस गायकवाड, उपप्राचार्य प्रियांका मिस्त्री व प्राध्यापक विवेक कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स