वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला १९९२ -९३ सालच्या दहावी वर्गाचा स्नेहमेळावा २७ मे रोजी..!
वेंगुर्ला दर्या राजा बीच रिसाँर्ट येथे २७ मे रोजी एक दिवस स्नेहमेळावा..
बांदा | राकेश परब :
वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला १९९२ -९३ सालच्या दहावी वर्गाचे विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ मे रोजी होणार आहे. २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजता एकत्र येणार आहेत.त्यानंतर दर्या राजा बीच रिसाँर्ट, सागरेश्वर बीच,वेंगुर्ला येथे एक दिवस स्नेहमेळावा होणार आहे.
२९ वर्षापूर्वीच्या सर्वत्र विखुरलेल्या आपल्या शालेय मित्रांना एकत्रित भेटण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्ताने दर्या राजा बीच रिसाँर्ट, सागरेश्वर बीच,वेंगुर्ला येथे एक दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक जुन्या आठवणीना उजाळा देण्यात येणार आहे. १९९२-९३ च्या वर्ग मित्रानी उपस्थित राहून कार्यक्रमास रंगत आणावी असे आवाहन १९९३ बँच गेट टुगेदर नियोजन समिती कडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)