ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, दोघांचा मृत्यू..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, दोघांचा मृत्यू..!</em>

प्रकाशन: 24 May 2022 07:02 PM
वाचन संख्या 250

मालवण | प्रतिनिधी :
आताची मोठी बातमी आहे. मालवणमधल्या तारकर्लीत (Tarkarli, Malvan) पर्यटक बोट बुडाली आहे. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू तर दोंघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटीत एकूण http://localhost/news/public/uploads/20 पर्यटक होते. सुदैवाने 16 पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे. स्थानिकांनी बोट बुडाल्याचे दिसताच मदतकार्य सुरु केलं.. स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना हा अपघात झाला. सर्व पर्यटक पुणे आणि मुंबई इथले आहे.
मुंबई आणि पुणे इथले काही पर्यटक आज सकाळी स्कुबा डायव्हिंगसाठी मालवणमधल्या तारकर्ली इथे आले होते. दुपारी स्कुबा डायव्हिंग करुन बोटीने परतत असताना बोट बुडाली. यात नाकातोंडात पाणी गेल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाला तर 16 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पण यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
बुडालेल्या बोटीचं नाव जय गजानन असल्याची माहिती समोर आली आहे. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिकांनीही बचाकार्यात मोठी मदत केली. त्यामुळे 16 पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आलं.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स