ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
काळसे गावचा पाणीपुरवठा तीन दिवस ठप्प...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

काळसे गावचा पाणीपुरवठा तीन दिवस ठप्प...!

प्रकाशन: 24 May 2022 05:34 PM
वाचन संख्या 52

मालवण नगरपालिकेचा २४ तास पाणी उपसा ठेवतोय काळसेवासीयांना धामापूर तलावाच्या पाण्यापासून वंचीत.

सरपंच केशव सावंत यांची मालवणचा पंप चार तास बंद ठेवण्याची मागणी.

चौके | प्रतिनिधी :
ऐतिहासिक धामापूर तलावातील पाणी धामापूर , काळसे आणि मालवण शहराला नळयोजनेद्वारे पुरविले जात असून धामापूर तलावाशेजारी भव्य जॅकवेल ( पाणी साठवण विहीर ) उभारून त्यामध्ये तलावाचे पाणी छोट्या ओढ्याद्वारे सोडले जाते आणि सदर जॅकवेल मध्ये मालवण नगरपालिका , धामापूर ग्रामपंचायत आणि काळसे ग्रामपंचायत यांनी नळयोजनेमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी लागणारा पाणीसाठा उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत.
परंतु सध्या तलावातील पाणी पातळीत घट झाल्याने तलावातील पाणी जॅकवेल मध्ये येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे काळसे आणि धामापूर नळयोजनेच्या पंपांच्या तुलनेने जास्त खोल असलेले मालवण नळयोजनेचे १२० hsp पॉवरचे दोन पंप यांच्या साहाय्याने २४ तास पाणी उपसा करत असून कुंभारमाठ येथे तब्बल ६ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी नियमित भरली जात आहे. त्यामुळे धामापूर येथील जॅकवेल मधील पाणी पातळी नियमित कमी राहिल्याने काळसे ग्रामपंचायतच्या नळयोजनेसाठी लागणारा पाण्याचा उपसा करण्यासाठी पाण्याचा मुबलक साठाच शिल्लक राहत नसल्याने गेले तीन दिवस काळसे गावाला पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्यच झालेले नाही.
धामापूर नळयोजनेचा पंप १५ hsp पॉवरचा आणि काळसे नळयोजनेचा पंप २५ hsp पॉवर चा असल्याने तो जास्त खोलवर सोडणे शक्य होत नाही त्यामुळे पाणीपातळी जास्त असेल तरच धामापूर आणि काळसे गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. अशी माहिती काळसे सरपंच केशव सावंत यांनी आज दिली.
दरम्यान सलग तीन दिवस नळाला पाणी न आल्याने काळसे गावातील ग्रामस्थ मात्र आक्रमक झाले असून प्रथम स्थानिक रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरवा आणि नंतरच शहराला पाणी पुरवठा करा अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आणि गावकऱ्यांच्या या रोषाला सरपंच केशव सावंत यांना सामोरे जावे लागत आहे.
या बिकट परिस्थितीवर उपाय म्हणून मालवण नगरपालिकेने २४ तास उपसा करणारा पंप दिवसातून किमान ४ तास तरी बंद ठेवून पाणी उपसा थांबवावा जेणेकरून जॅकवेल ( पाणी साठवण विहिरीमध्ये ) मुबलक पाणीसाठा होईल आणि काळसे वासियांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार नाही. अशी मागणी सरपंच केशव सावंत यांनी मालवण नगरपालिका मुख्याधिकारी जिरगे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे संपर्क करून केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स