सिंधुदुर्ग व कोकणचे सुपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुनिर्मल फाउंडेशन तर्फे सुनिर्मल समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार..!
चिंदर |विवेक परब :
तिमिरातुनी तेजाकडे ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबवणारे शिक्षण प्रसारक, जवळपास सात पदवी असणारे युवा शिक्षण महर्षी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कोकणचे भूमिपुत्र श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांच्या शैक्षणिक कार्याची विशेष दखल घेत सुनिर्मल फाउंडेशन, मुंबई तर्फे मुख्य अतिथी श्री. जगन्नाथराव हेगडे (मा. नगरपाल मुंबई), श्री. सुकृत खांडेकर (संपादक, दैनिक प्रहार) व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. गणेश विद्या मंदिर हायस्कूल, धारावी येथे सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले.
कोकणच्या सुपुत्राचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ओळखून त्याची विशेष दखल घेत मुंबई येथील सामाजिक संघटनेने पुरस्कार प्रदान करणे ही एक विशेष बाब आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)