ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>बांदा - शेर्ले ब्रीजचा जोडरस्ता तातडीने न केल्यास आंदोलन.</em>

<em>बांदा - शेर्ले ब्रीजचा जोडरस्ता तातडीने न केल्यास आंदोलन.</em>

प्रकाशन: 19 May 2022 04:16 PM
वाचन संख्या 51

भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांचा इशारा…!

बांदा |राकेश परब : बांदा तेरेखोल नदीवर ब्रीजचे बांधकाम करण्यात लघुपाटबंधारे विभागाने मुळातच जाणीवपूर्वक उशीर केला. सध्या पावसाळा तोंडावर असून ब्रीजच्या दुतर्फा जोडरस्ता पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बांदा ग्रा. पं. सदस्य तथा भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बांदा तेरेखोल नदीवर ब्रीज व्हावा हे येथील दशक्रोशीतील जनतेची मागणी होती. यासाठी बांदा व शेर्ले भागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी लढा दिला. अथक प्रयत्नानंतर लघु पाटबंधारे विभागाच्या कालव्याचे पाणी वेंगुर्ल्यापर्यन्त देण्यासाठी पाईप लाईनची गरज भासली. सदर पाईपलाईन ब्रीज उभारुन नेण्याची मागणी प्रशासनाने मान्य करुन ब्रीज उभारला.
ब्रीजचा फायदा येथील जनतेला होण्यासाठी ब्रीजच्या दुतर्फा जोडरस्ता होण्याची गरज आहे. ब्रीजच्या जोडरस्त्यासाठी मातीची भर मिळत नाही हा युक्तिवाद हास्यास्पद आहे. तसेच टाकलेली माती पुराबरोबर वाहून बाजारपेठेत घुसण्याचा धोकाही आहे. त्यामुळे जोडरस्ता करण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे. अन्यथा भाजपाच्या माध्यमातून जन आंदोलन उभारण्याचा इशारा जावेद खतीब यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स