खबरदार जर टाच मारुनी…..; मालवण तुमचाच आसा पण….!
आमदारांची कामे असूनही दिसत नसतील तर खरंच आश्चर्य..
ज्येष्ठ समाज तज्ञ,भाषा अभ्यासक व माजी नगरसेवक नितीन वाळके यांना समजून न घेता उगिचच भाषेबद्दलच जाब…?
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी , माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची यत्किंचितही धडपड लक्षात येत नाही….?
माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकरही आरोप करतात पण अभ्यास करुनच…!
ग्रामीण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहर प्रभारी विजय केनवडेकर सुद्धा उगीच विरोधाला विरोध करत नाहीत..
मातृत्व आधार फाऊंडेशन सारखी सक्षम संस्था मालवणच्या प्रत्येक हालचालींवर ठेवते कडक नजर..
असा आहे मालवण माझा…
मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक):सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातला पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 संपन्न झाला.
आमदार वैभव नाईक यांची भयानक इच्छाशक्ती व प्रशासनाची काॅर्पोरेट साथ यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातला पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 संपन्न झाला.
आमदार वैभव नाईक यांची भयानक इच्छाशक्ती व प्रशासनाची
महोत्सवा दरम्यान आमदार नाईक यांनी त्रुटींवर काम करायचे समंजस आवाहन केले…
पण त्रुटी व अभ्यास बाजुला सोडून काही नेते मंडळी आमदार वैभव नाईक,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व प्रशासक संतोष जिरगे यांच्या विषयी काडीचाही अभ्यास न करता व महोत्सवाला उपस्थित न रहाता, सोशल मिडिया वरून आरोप करु लागले आहेत.
माजी नगरसेवक नितीन वाळके यांनाही बोली भाषेच्या कुठल्यातरी नाहक प्रकरणात अडकवायचे षडयंत्र चालू आहे.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी माजी नगरसेवक व माजी बांधकाम मंदार केणी व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांच्यावरही नाहक आगपाखड सुरु झाली आहे.
याच शहरात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व दीपक पाटकर,एका पक्षाचे जबाबदार प्रभारी विजय केनवडेकर व तालुका स्तरावर धोंडी चिंदरकर यांसारख्या राजकीय अनुभवी लोकांनी सुद्धा असले आरोप नाही केलेत इतके घाणेरडे आरोप सोशल मिडियावरुन हॅश टॅग मालवण करुन चालवले जात आहेत…व दुर्दैवाने मालवणचे काही युवा याला बळी पडत आहेत.
राजकारण म्हणजे नेमके काय ते दाखवले त्या मधु दंडवते, सुबोध आचरेकर, आर जी चव्हाण, साईनाथ चव्हाण, भाई यादव,आना मालंडकर, अरविंद हुले, लीलाधर पराडकर, मनोहर देऊलकर , यतीन खोत,राजन वराडकर, महेंद्र म्हाडगुत,पूजा करलकर, शीला गीरकर,दर्शना कासवकर, अरविंद मराळ, जगदीश गांवकर, माजी नगराध्यक्ष व कॅप्टन ऑफ द करंट शिप महेश कांदळगांवकर यांसारखी नावे असताना आतून व बाहेरुन कोणी ‘मालवणला’ बोलायची तथा उगीचच दोन चार पर्यटन फेर्यांवरुन मालवण म्हणजे काय ते मालवणवाल्यांनाच टीकेतून सांगायची गरज नाही.
याच मालवणात अगदी वाईट तोंडाचा एक सिजर रहातो..ठरवलं तर दबंग पण शांत वागणारे माजी जि प सदस्य हरी खोबरेकर रहातात..
एक दमदार युवा मंदार ओरसकर ,बाबी जोगी, रहातो…व ललित चव्हाणही..
मालवण कामात पक्ष बघत नाही तर पक्षा पक्षात काम बघतो.
केंद्रीय व कॅबिनेट मंत्री नारायण राणे सुद्धा मालवणवर कितीही नाराज झाले तरी मालवणचे म्हणूनच ओळखले जातात व त्यांच्या नाराजीतही मालवणच्या देवबागचा 1 कोटीचा बंधारा मंजूर होतो…
बोललो व बोलत व लिहित राहीलो तर संपादकिय कमी पडेल.
तरी एक सक्षम युवा अध्यक्ष सतीश आचरेकरबद्दल नाहीच बोललोय अजून.
उगीच पक्ष,प्रशासन व जनता ही काॅकटेल दिशाभूल करायचा प्रयत्न दिसला तर आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल त्या घटकाची ‘जाहीर’ दखल घेईलच .
मालवणला नेहमी सहकार्य दिलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांना कृतज्ञ राहूनच प्रत्येक आतील व बाहेरील मालवण विरोधकाला सांगतोय..” खबरदार जर टाच मारूनी….!”
नागरिक शास्त्राचा अभ्यास झाला नसेल ..हरकत नाही…
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल नक्कीच तो चालू ठेवेल.
आपल्या क्षेत्रातील पालकमंत्री,खासदार, जि.प अध्यक्ष, आमदार, नगराध्यक्ष व सरपंचांचा आदर आधी करायला शिकलो तर पुढचे राजकारण कळेल…नाहीतर पेन,कागद व मोबाईल तर गॅन्गस्टरही वापरतात.
ही खबरदारी उर्मट वाटली तर खरंच हरकत नाही पण मुख्य महामार्गापासून 33 किलोमीटर आत कष्टाने व कुठलाही व्यावसायिक भौगोलिक लाभ नसताना जपलेल्या साध्या लोकांची ही तळमळ आहे…..वर्षानुवर्षे .
आजही मालवणात http://localhost/news/public/uploads/20 रुपयात सकाळी काम करायच्या ऊर्जेसाठी पोट भरते व वीस रुपयात डाॅक्टर आम्हाला बरे करतात…तो शांततेचा अधिकार अबाधीत राखणार्या प्रत्येक घटकाला वंदन. फोटो व प्रोटोकॉल्सच्या खूप पुढे आहे मालवण.
सुयोग पंडित.( मालवण नागरिक व मुख्य संपादक)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)