ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
एकपात्री अभिनय स्पर्धेत नूतन परब प्रथम.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एकपात्री अभिनय स्पर्धेत नूतन परब प्रथम.

प्रकाशन: 18 May 2022 07:36 PM
वाचन संख्या 234

आडवली हायस्कुल येथे स्पर्धेचे आयोजन…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :आडवली हायस्कुल येथे आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत कु. नूतन सत्यवान परबने प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक -अथर्व विद्याधर तुळपुळे, तृतिय क्रमांक -कु. सिद्धी अरविंद साटम,
उत्तेजनार्थ कु. रूतूजा सुरेश मेस्त्री ,कु .साक्षी विद्याधर तुळपुळे ,कु हर्षदा राजन मालडंकर ,कुमारी सोनम संदीप घाडिगावकर ,कु .श्रावणी सुरेश मेस्त्री यांची निवड करण्यात आली.
विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना रोख रक्कम स्वरूपात पारितोषक वितरित करण्यात आले. सदर स्पर्धा उद्योगस्नेही सर्व्हिसेस मुंबई या सेवा उद्योगाचे मालक श्री प्रमोद बळीराम साटम व माजी विध्यार्थी आडवली हायस्कूल , श्री देव रवळनाथ भक्त ग्रामविकास मंडळ व सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. सहभागी स्पर्धक व विजेत्या स्पर्धकांना प्रसाद गणेश साटम,श्री मंगेश यादव व श्री चंद्रकांत हरिश्चंद्र साटम यांनी रोख रक्कम स्वरूपात पारितोषक वितरित केली .या स्पर्धेसाठी सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई चे अध्यक्ष डॉ .श्री प्रकाश साटम ,उपाध्यक्ष श्री सुभाष साटम ,श्री बाळकृष्ण सावंत ,सदस्य श्री प्रमोद साटम ,श्री रजनीकांत देऊ नाईक साटम ,शाळा समिती अध्यक्ष श्री कमलाकांत कुबल ,श्री मालप,श्री सावंत ,सौ .सीमा घाडी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सर शिक्षक व्रुंद व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी व पालक शिक्षणप्रेमी आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स