केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते देवबाग बंधाऱ्याचे भूमिपुजन २२ मे रोजी.
केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या वचनपूर्तीने भाजपात चैतन्य.
भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी केला 1 कोटीच्या बंधार्यासाठी पाठपुरावा.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात दिवसेंदिवस क्षतीग्रस्त होणार्या देवबाग गावाच्या संरक्षणासाठी रचण्यात येणार्या ‘देवबाग बंधाऱ्याचे’ भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी दि .२२ मे रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एप्रिल मधील संपर्क सभेच्या वेळी देवबाग वासियांसाठी खासदार फंडातील एक कोटी रुपये बंधाऱ्यासाठी देत असल्याचे जाहीर केले होते . त्याचा पाठपुरावा माजी खासदार व भाजप प्रदेश सरचिटणीस व युवा नेते निलेश राणे यांनी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकार्यांकडे खासदार फंडातील एक कोटी निधिसाठी पत्र दिले.
यंदाचा मान्सून तथा पावसाळा येण्यापूर्वी काम सुरू करण्यासाठी माजी खासदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी देवबाग बंधार्यासाठी विशेष प्रयत्न केले. आता त्याचे भूमिपूजन मा .नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे .
यावेळी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच जिल्हा पदाधिकारी ,शक्ती केंद्रप्रमुख ,बूथ प्रमुख, तालुका कार्यकारणी सर्व आघाडीच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मालवण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धोंडी चिंदरकर व प्रभारी विजय केनवडेकर,मालवण शहर
यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)