माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,नगरपरिषद प्रशासन व एस टी व्यवस्थापन यांचे मातृत्व आधार फाऊंडेशनच्या अध्यक्षांनी मानले जाहीर आभार.
मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी काल रात्री व्यक्त केली होती शहरातील सामाजिक,प्रशासकीय व राजकीय यंत्रणांबाबत खंत..
मालवण | विनीत मंडलिक : मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या डिजिटल मंच समूहावरुन मालवण एस टी स्टॅन्ड आवारातील शौचालयांच्या अवस्थेतबद्दल काल रात्री अध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी लक्ष वेधले होते.
त्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन, माजी नगराध्यक्ष व मातृत्व आधार फाऊंडेशनच्या डिजिटल समूहावरील समाज संवेदनशील सदस्य महेश कांदळगांवकर यांनी नगरपालिकेच्या मलमूत्र उपसा तथा सक्शन यंत्रणा वाहनाच्या सहाय्याने एस टी स्टॅन्डच्या शौचालयाची टाकी व शौचालये स्वच्छ करून घेतली आहेत.
सध्या नगरपरिषदेचे कामकाज प्रशासकीय नेतृत्वाखाली आहे आणि तरिही सामान्य नागरिकांना
अर्ज विनंतीच्या फेर्यात न अडकवता माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी तत्काळ दखल घेतली म्हणून स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी मातृत्व आधार फाऊंडेशनच्या त्याच डिजीटल मंचावरुन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचे जाहीर आभार मानले आहेत.
मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी, या वृत्ताची प्रसार माध्यम म्हणून गंभीर व तात्काळ दखल घेतल्याबद्दल आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सर्व टीमचीही विशेष प्रशंसा केली आहे.
आता एस .टी स्टॅन्डवरील शौचालय व परिसरातील दैनंदिन स्वच्छते बाबत सूचना देण्यात आल्या आहेत असे सूत्रांकडून समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)