<em>आजगाव साहित्य कट्ट्याची एकोणीसाव्या सभेचे आयोजन …!</em>
चिंदर | विवेक परब : आजगाव येथील “साहित्य प्रेरणा कट्ट्याची” एकोणीसावी सभा शुक्रवार दिनांक २० मे रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे.
या सभेत ‘माझे जीवन माझे वाचन’ या विषयावर सौ. माधुरी काकतकर-आठल्ये या आपले विचार मांडतील. सौ. आठल्ये या नवी मुंबईच्या रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. बालपणापासून ‘पुस्तक वाचन’ हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात सुमारे पाचशे पुस्तके असून त्या नेहमीच विकत घेऊन पुस्तके वाचतात.
अलिकडे त्या कविता ,लेख असे लिखाण करतात.त्यांचे हे लिखाणही रसिकमान्य होत आहे.
त्यांचे विचार ऐकण्यासाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)