ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद..!

बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद..!

प्रकाशन: 14 May 2022 01:40 PM
वाचन संख्या 60

बांदा | राकेश परब : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने शालेय व खुल्या गटात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उद्या शनिवारी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – पहिली ते चौथी गटासाठी “छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण” हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम – सर्वज्ञ वराडकर, द्वितीय – नील बांदेकर, तृतीय – मृणाल पाटकर. पाचवी ते आठवी गटासाठी “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम – श्रावणी राजन आरावंदेकर, द्वितीय – शमिका सचिन चिपकर, तृतीय – वेदांत संदीप सावंत.
नववी ते बारावी या गटासाठी “छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती” हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम – शमिका चिपकर, द्वितीय – अलिशा पाटकर, तृतीय- अथर्व शिरसाठ. खुल्या गटासाठी “छत्रपती संभाजी महाराज यांचे राजकारण व समाजकारण” हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम – नेत्रा विनोद राणे, द्वितीय – शुभेच्छा संदीप सावंत, तृतीय- प्रकाश लक्ष्मण पाटील यांनी यश मिळविले.
स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रकाश तेंडोलकर, रुपेश पाटील, चंद्रकांत सावंत, जयेश म्हाडगूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण सावंत यांनी केले. प्रास्ताविक जे डी पाटील यांनी केले. यावेळी अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, रीना मोरजकर, प्रथमेश राणे, नारायण बांदेकर, संतोष मंझिलकर, केदार कणबर्गी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स