ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दांडीच्या 'वेळेवर' वाळुच्या शिल्पांचा मेळा….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दांडीच्या 'वेळेवर' वाळुच्या शिल्पांचा मेळा….!

प्रकाशन: 13 May 2022 11:59 AM
वाचन संख्या 77

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून साकार होणारा नगरपरिषद पर्यटन महोत्सव.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी समुद्रकिनारी मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन विभाग आयोजित मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त वाळुशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपासून स्पर्धकांनी वाळुशिल्पे साकारण्याचे सुबक काम हाती घेतले होते.
आकार घेत असलेली वाळुशिल्पे पाहण्यासाठी पर्यटक आणि बच्चे कंपनीने दांडी समुद्रकिनारे फुलून गेले आहेत.

Article image
Article image

खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनातून व आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून साकार होणार्या या पर्यटन महोत्सवाचे जाहीर निमंत्रण, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी नगरसेवक व नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सर्व मालवणवासियांना व जिल्हावासियांना दिले आहे.

मालवण शहरातील युवा नेतृत्व मंदार ओरसकर यांनी युवक व युवतींना या पर्यटन महोत्सवाचा मनसोक्त आस्वाद घेऊन ‘जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022’ मध्ये सहभागी होण्याचे विनम्र आवाहन केले आहे.

या नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 हा जास्तीत जास्त महिला वर्गासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सांस्कृतिक व सामाजिक चैतन्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे असे प्रतिपादन मालवणच्या शिवप्रेमी समाज सेविका व पर्यावरण प्रेमी सौ शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स