मालवणात सायकल रॅलीला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.!
प्रसिद्ध सायकलपटू डाॅक्टर रामचंद्र चव्हाण ठरले विशेष आकर्षण.
मालवण | ब्युरो न्यूज : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ मे या कालावधीत दांडी समुद्रकिनारी मालवण पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने आज शुक्रवारी सकाळी शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार अजय पाटणे यांनी रॅलीस आरंभ झेंडा दाखवला. यावेळी सायकलपटू रामचंद्र चव्हाण उपस्थित होते. रॅलीस शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)