ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी श्रीफळ वाढवून केले नगरपरिषदच्या नवीन सुसज्ज अग्निशामक वाहनाचे लोकार्पण...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी श्रीफळ वाढवून केले नगरपरिषदच्या नवीन सुसज्ज अग्निशामक वाहनाचे लोकार्पण...!

प्रकाशन: 12 May 2022 07:10 PM
वाचन संख्या 315

फायर’ नकोच असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी मालवणवासिय व व्यापार्यांना दिले सुरक्षीततेच्या सदिच्छांचे ‘फ्लाॅवर!

मुख्याधिकारी संतोष जिरगे,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी यांच्यासह मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर व तमाम व्यापारी बांधव उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या ताफ्यात नवीन बहुउद्देशिय फायर फायटर वाहन दाखल झाले. आमदार वैभव नाईक यांनी श्रीफळ वाढवून त्याचे लोकार्पण केले. मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या वाहनाचे सर्व सामान्य जनता व व्यापार्यांसाठी लोकार्पण झाल्याची औपचारिक घोषणा केली. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी या अग्निशमन वाहनाच्या उपलब्धतेसाठिची राजकीय व प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगितली . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषद व सामान्य शहरवासियांसाठी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांनी नगरपरिषद,माजी सहकारी नगरसेवक व शहरवासियांतर्फे त्यांचे विशेष आभार मानले.या अग्निशमन वाहन लोकार्पण प्रसंगी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार वैभव नाईक यांनी सुसज्ज व स्वयंचलित अग्निशामक वाहनाचे, श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित सर्वांना या सुविधेची कधीच गरज पडू नये व मालवण वासिय नेहमीच सुरक्षित राहतीलच अशा सदिच्छा दिल्या.उपस्थित सर्वांसाठी नगरपरिषदेने या सुसज्ज वाहनातील विविध ‘फीचर्सची’ म्हणजे कार्यकारी प्रणालीची छोटी प्रात्यक्षिके दाखवली.मालवण व्यापारी संघाने गेली अनेक वर्षे या अग्निशमन वाहनासाठी मालवणचे नगरसेवक,नगराध्यक्ष,आमदार व खासदार यांचा पाठपुरावा केला होता.मध्यंतरी नगरपरिषदेला सुसज्ज अग्निशमन वाहन मेटेनन्स शक्य नसेल तर व्यापारी संघाने त्याची जबाबदारी घ्यायचीही तयारी दर्शविली होती .

आमदार वैभव नाईक यांनी या गोष्टीची विशेष दखल घेऊन व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकार्यांनी व्यापारी संघातील सदस्य व पदाधिकारी यांच्या मागणीचा पाठपुरावा करत नगरपरिषदेला ही सुसज्ज यंत्रणा मिळवून दिली म्हणून व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचे सूत्रांकडून समजते.

Article image

या लोकार्पण कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक,नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे,मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्यासह माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत, माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी , माजी नगरसेवक पंकज सादये , माजी नगरसेवक नितीन वाळके , माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे,माजी नगरसेविका शीला गिरकर व माजी नगरसेविका तृप्ती मयेकर,माजी नगरसेविका श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका सेजल परब , माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व शिवप्रेमी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत, ज्येष्ठ व्यावसायिक राजा शंकरदास, रवी तळाशिलकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर,अमेय देसाई, सन्मेष परब, मनोज मोंडकर, युवा नेते व व्यापारी मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, तपस्वी मयेकर, आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ अन्य माजी नगरसेवक ,लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व बहुपक्षीय कार्यकर्ते व मालवण नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी श्री पाटकर , हळदणकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. मालवण दत्तमंदिर, भरड चे युवा पुरोहीत श्री गौरीश काजरेकर यांच्या हस्ते वाहनाचे प्रथम विधीवत पूजन करण्यात आले होते.यावेळी व्यापारी महासंघाचे व मालवण बाजारपेठेतील मान्यवर व्यावसायिक मसूद मेमन, नानां पारकर,बाळू अंधारी, नितीन तायशेट्ये,किरण वाळके, सरदार ताज़र,अरविंद ओटवणेकर सराफ़, किरण कारेकर,संतोष वराडकर व मालवणचे अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.

Article image

यावेळी नगरपरिषदचे तज्ञ व कुशल चालक शेर्लेकर, विलास पुरोहीत व रुपेश हडकर व कर्मचारी वैभव वळंजू यांनी सुसज्ज अग्निशामक वाहन यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले.या लोकार्पण कार्यक्रमात नगरपरिषद कर्मचारी मिथुन शिगले, शेख़ व इतर कर्मचारी उपस्थित होते. या लोकार्पण कार्यक्रमानंतर आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी माध्यमांना मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव http://localhost/news/public/uploads/2022 च्या आयोजनातील ताजे अपडेटस् दिले .

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स