ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डेगवे-आंबेखणवाडीच्या ब्राह्मणीस्थळात  धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डेगवे-आंबेखणवाडीच्या ब्राह्मणीस्थळात धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

प्रकाशन: 12 May 2022 06:29 PM
वाचन संख्या 31

बांदा |राकेश परब: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सकाळी ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता; श्री स्थापेश्वर ,महालक्ष्मी देवतांची डेगवे गावचे माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी सपत्निक श्री ब्राह्मणीस्थळात पुजा केली व त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम व त्यानंतर सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापुजेस प्रारंभ केला .

डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे

अलीकडेच सदर.परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून पुर्ण केले आहे.त्यामुळे मंगलदास देसाई यांच्या परीवारातर्फे श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन केले होते.

त्या निमित्ताने भाविकांनी तिर्थ प्रसादाचा व दुपारी महाप्रसादाचा,लाभ घेतला .रात्री श्री ब्राह्मणी भजन मंडळ,आंबेखणवाडी यांचा भजनाचा,कार्यक्रम संपन्न झाला. त्या नंतर रात्री पुणे येथील किर्तनकार हरिहर नातु यांचे किर्तन पार पडले.सदर किर्तनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते..मुलांचे विविध कार्यक्रम झाले.विद्युत रोषणाईने ;व रांगोळीने परीसर सुशोभित केला होता.गावातील ग्रामस्थांनी व मान्यवरांनी ,माहेरवाशीणीनी हितचिंतक भाविकांनी दर्शन घेतले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेगवे,आंबेखणवाडीतील ग्रामस्थ,महिला,लहानमुले यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स