नंदकिशोर केसरकर यांचे निधन..!
बांदा | राकेश परब : महादेवाचे केरवडे येथील नंदकिशोर नारायण केसरकर वय ५९ यांचे अल्पशा आजाराने उपचार दरम्यान गोवा बांबुळी येथे दुःखद निधन झाले. नंदकिशोर केसरकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचा गावात मोठा मित्रपरिवार होता.तसेच ते मित्रपरिवार मध्ये वेळप्रसंगी मदत करीत असत.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, पत्नी, असा परिवार आहे. माणगाव येथील प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते बाळा उर्फ आत्माराम केसरकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)