ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सामान्य युवकांच्या राजकीय भिडस्तपणाने झाकलेले 'बंद दार' उघडणारे मंदार केणी…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सामान्य युवकांच्या राजकीय भिडस्तपणाने झाकलेले 'बंद दार' उघडणारे मंदार केणी…!

प्रकाशन: 11 May 2022 11:47 AM
वाचन संख्या 174

मालवण | विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या खुद्द मालवण शहरात ‘राजकारण’ ही गोष्ट ठरवली तर सामान्य बालपण गेलेले युवकही साध्य करु शकतात हे मंदार केणींनी सिद्ध केले.

साल http://localhost/news/public/uploads/2005 पर्यंत राजकीय भिडस्तपणामुळे मालवण तालुक्यातील व शहरातील बहुतांश युवकांना राजकारणात उतरण्यासाठी वय,व्यावसायिक यश आणि इतर गोष्टींच्या भीतीच्या बागुलबुवावर मंदार केणींनी मात केली .

Article image

राजकीय अभ्यासाची दारे बंद का असतात याचा दृष्टी आड सृष्टी असा विचार न करता ते दार उघडण्यासाठी युवा वय किंवा सामाजिक अनुभवाची कमतरता या अटींची गरजच नसते हे मंदार केणींनी दाखवून दिले.

जे जे झाकून राहीले होते ते ते एक दार उघडत गेल्यावर मंदार केणी या युवकाचा नगरसेवक झाला..व पुढे नगरपरिषदेचा बांधकाम सभापतीही.

आपला रोजचा घरचा जेवणाचा डबा आपल्यासोबत घेऊन घराबाहेर पडणारे काही राजकीय माणसं असतात त्यातील मंदार केणी एक आहेत. प्रोफेशनल किंवा राजकीय कारकिर्द घडवताना स्वतःचे मनःस्थिती स्थैर्य व तब्येतीचे गांभिर्य जपणे ही राजकारणाची व स्विकारलेल्या जबाबादारीचाच भाग असतो हे मंदार यांना कळले आहे.
स्वतःला प्रसन्न व माफक रुबाबदार राखले तरच समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतःसकट आसपास सर्वांनाच हुरुप येतो हे मंदारना पटले आणि त्याच रुबाबदारपणे त्यांनी अनेक सामाजिक बांधिलकीची कामेही सहकार्यांसोबत येत मार्गी लावली.
प्रसंगी त्यांच्या व त्यांच्या सहकारार्यांच्या प्रसन्नतेवर टीकाही झाली पण सामाजिक बांधिलकीचा व स्वतःच्या उद्देशांचा चमकदार गाॅगल दृष्टिवर असल्यामुळे त्यांनी व सहकार्यांनी स्वतःचा तो सामाजिक दृष्टीसाठी आवश्यक व संरक्षक गाॅगल नजरेसमोरुन उतरु दिला नाही.
माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स