ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीम.संपदा बागी , शिवराज सावंत यांना जाहीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीम.संपदा बागी , शिवराज सावंत यांना जाहीर..!

प्रकाशन: 10 May 2022 08:01 PM
वाचन संख्या 73

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र शिक्षक पॅनेल आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण दांडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री.शिवराज सावंत व वैभववाडी कोकीसरे नारकरवाडी विद्यामंदिरच्या तंत्रस्नेही शिक्षिका श्रीम.संपदा बागी यांची निवड करण्यात आली.

Article image
श्री.शिवराज सावंत
Article image
श्रीम.संपदा बागी

महाराष्ट्र शिक्षक पॅनेल हा सुमारे पंचवीस हजार शिक्षकांशी संपर्क जोडणी असलेला तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय समुह आहे.या समुहामार्फत विद्यार्थी उपक्रमांसह दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराचे आयोजन केले जाते.या करीता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उपक्रमशील कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांची निवड सदर समुहामार्फत करण्यात येते.

सिंधुदुर्ग मधून यावर्षी मालवण दांडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत यांची निवड झाली आहे,गेली ३० वर्षे आपल्या सेवाकालात श्री.शिवराज सावंत यांनी अनेक उपक्रम,नवोपक्रम आपल्या शाळेत राबविले,बालचित्रवाणी पुणे मार्फत त्यांचे पाच शैक्षणिक पाठ सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित झाले आहेत,अनेक राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिक प्राप्त झाली आहेत.विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांच्या शैक्षणिक साहित्याची पाचवेळा राज्यस्तरीय निवड झाली आहे.राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व जिवनशिक्षण लेखन कार्यशाळा यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता,त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत तसेच त्यांनी मार्गदर्शन केलेले २१ विद्यार्थी शिष्यवृत्ती व नवोदय गुणवत्ता यादीत झळकले आहेत,२००९ मध्ये त्यांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने ता सन्मानित आहेत.अशा या विद्यार्थीप्रिय शिक्षकास सेवासन्मान पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सर्व थरातून कौतुक होत आहे.

    त्याचप्रमाणे वैभववाडी विद्यामंदिर कोकीसरे नारकरवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.संपदा बागी यांनी आपल्या २० वर्षाच्या सेवाकालात अनेक उपक्रमात यशस्वी सहभाग नोंदविला आहे,सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर त्यांची दोनवेळा मुलाखत प्रसारित झाली आहे. CCRT नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती,तसेच सिंधुदुर्ग शैक्षणिक चळवळ पुस्तक छपाई,प्रकाशन व जिल्हाभर पुस्तिकेचे वाटप यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई तर्फे द्रोणाचार्य पुरस्कार २०१७ मध्ये प्राप्त झाला होता,२०१९ मध्ये कलागौरव पुरस्कार,शिक्षण माझा वसा २०२० हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे,राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल श्रीम.संपदा बागी यांचे विशेष कौतुक होत आहे.

      महाराष्ट्र शिक्षक पँनलचा राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार वितरण सोहळा दि.१५ मे २०२२ रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे होणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री डाँ.निशिगंधा वाड करणार करणार आहेत,कार्यक्रमाचे अध्यक्षपद शिक्षक आमदार श्री.विक्रम काळे भुषविणार आहेत,प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण आयुक्त श्री.सुरज मांढरे,शिक्षक आमदार श्री.बाळाराम पाटिल,शिक्षक आमदार श्री.जयंत आसगांवकर,पदवीधर आमदार श्री.सुधीर तांबे व महाराष्ट्र शिक्षक पँनलचे संस्थापक सदस्य श्री.दीपक चामे सर आदी उपस्थित राहणार आहेत,तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनेल तर्फे गुणी शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनेलची सर्व टीम उपस्थित राहणार आहे.महाराष्ट्र शिक्षक पँनलच्या या उपक्रमाचे विविध क्षेत्रातुन कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स