बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचे झाले लोकार्पण...!
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत इमारतीचे बांधकाम.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नुतन इमारतीचे लोकार्पण सर्व जमिन मालक यांच्या प्रमुख उपस्थिती नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे अशोक रामचंद्र पालव यांच्या हस्ते फित कापून झाले. सर्व प्रथम नुतन ग्रामपंचायत कार्यालयात जमिन मालक शिवराम बापु पालव यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले.
यावेळी जमिन मालक जानकीबाई रामचंद्र पालव , भगवान शिवराम पालव, दिनेश लक्ष्मण पालव ,शिवराम बापू पालव ,सदानंद रामचंद्र पालव, अशोक रामचंद्र पालव,गोविंद रामचंद्र पालव,अनिल सदानंद पालव, दीपक भगवान पालव ,आशिष अंकुश पालव, गोविंद सोमा सावंत, कृष्णाजी दत्ताराम पालव, चैतन्य रामचंद्र पालव उपस्थित होते. सर्व जमिन मालकांचे ग्रामपंचायतीच्यावतीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या उद्घाटनाला सरपंच सौ. मानसी लक्ष्मण पालव, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, रंजना पालव, प्रकाश फणसे, ग्रामसेवक युगलकिशोर प्रभुगावकर, दाजी विश्राम पालव , अशोक जनार्दन पालव सूर्यकांत जनार्दन पालव,गोपाळ संभाजी पालव ,सिताराम सदाशिव सावंत,शरद आंगणे,ग्रामविस्तार अधिकारी व्हि. के. जाधव,कृषी अधिकारी संजय गोसावी, पोलीस काॅन्स्टेबल फरांदे व नाईक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)